व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर वाढणारी पर्यटकांची संख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार सुनील शेळके सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 12, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाला अधिक गती देतानाच पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका करून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. कुरवंडे येथील टायगर व लायन्स पॉईंट विकास आराखड्यातील विविध कामांची पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. यावेळी कुमार चौक ते टायगर पॉईंट या महत्त्वाच्या रस्त्याचे काम ७ मीटर रुंदीने वेगाने सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर वाढणारी पर्यटकांची संख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार सुनील शेळके सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही महत्त्वपूर्ण स्थळ पाहणी करण्यात आली. कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याचे काम वेगाने पूर्ण झाल्यास टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसह परिसरातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.

लोणावळा नगरपरिषद हद्दीत रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित जागांचे लवकरात लवकर भूसंपादन करून त्या जागा पीएमआरडीएच्या ताब्यात देण्याबाबतही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांना स्पष्ट सूचना करण्यात आल्या. त्यामुळे रस्त्याच्या कामातील अडथळे दूर होऊन विकासकामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

मावळचा पर्यटन विकास हा केवळ पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यापुरता मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरावा, हा आमदार सुनील शेळके यांचा प्रयत्न आहे. पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते सुकर झाले, वाहतूक कोंडी कमी झाली आणि पर्यटकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळाली, तर मावळमध्ये नव्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यातून हॉटेल, चहापानगृहे, स्थानिक खाद्यपदार्थ, वाहतूक, छोटे व्यावसायिक तसेच पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांना चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा या विकासकामामागील व्यापक उद्देश आहे.

‘मावळचा पर्यटन विकास अधिक गतिमान करणे, पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे आणि स्थानिकांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे’ हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आमदार सुनील शेळके यांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून रखडलेली कामे मार्गी लावण्यावर त्यांचा भर असून, टायगर व लायन्स पॉईंट परिसरातील रस्ते आणि पर्यटन सुविधांच्या विकासामुळे मावळच्या पर्यटनाला नवी झळाळी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी पीएमआरडीएच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिम्मत खराडे, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका
– शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
Potholes plague the roads in rural areas of Maval Taluka

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य !

August 11, 2026
Potholes on Indrayani River bridge near Takve Budruk risk of accidents for both two-wheelers four-wheelers

टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.