Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या वतीने आयोजित ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार व शिक्षक सन्मान सोहळा’ सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) अत्यंत उत्साहात पार पडला.
या प्रसंगी लोणावळा शहरातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा केवळ सत्काराचा नसून विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा त्याग आणि शिक्षकांच्या अनमोल योगदानाला सलाम करण्याचा दिवस होता.
गुणांपेक्षाही विद्यार्थ्यांचे ध्येय, संस्कार आणि प्रामाणिक प्रयत्न अधिक महत्त्वाचे असतात. मुलांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे असून, तेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार देतात.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रमुख वक्त्या ॲड. रंजनाताई भोसले (मेम्बर ऑफ बार कौन्सिल, महाराष्ट्र व गोवा) तसेच प्रमुख पाहूणे म्हणून आमदार सुनील शेळके व नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, शिक्षण सभापती सौ. दीपा आगरवाल, मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक, शिक्षक, पालक, पत्रकार बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक
