Dainik Maval News : पंढरीच्या वाटेवर वर्षानुवर्षे चालत, ऊन-पाऊस-वारा सोसत, मुखी विठ्ठलाचे नाम आणि हृदयात अखंड भक्तीचा दीप तेवत ठेवणाऱ्या ज्येष्ठ वारकरी बांधवांच्या त्याग, समर्पण आणि भक्तीला कृतज्ञतेची मानवंदना देण्यात आली. कामशेत ग्रामीण पत्रकार संघ, मावळ यांच्या वतीने आयोजित ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी नायगाव, कामशेत येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात भक्तिमय आणि भावस्पर्शी वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
पवनमावळ, नाणे मावळ आणि अंदर मावळ परिसरातील वारीची अखंड परंपरा जपणाऱ्या १५ ज्येष्ठ वारकरी महाराजांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये ह.भ.प. भिकाजी धोंडू ठाकर, ह.भ.प. भागूजी महाराज ठोंबरे, ह.भ.प. भगवान महाराज लोखंडे, ह.भ.प. सोपान महाराज येणपुरे, ह.भ.प. रघुनाथ वाघुजी आडकर, ह.भ.प. सदाशिव जगताप, ह.भ.प. शंकर महाराज शिरसट, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज टाकळकर, ह.भ.प. संभाजी भानुसघरे, ह.भ.प. भरत महाराज गायकवाड, ह.भ.प. रामचंद्र महाराज आलम, ह.भ.प. भागोजी महाराज करांडे, ह.भ.प. सिताराम महाराज तनपुरे, ह.भ.प. महादू महाराज कुटे आणि ह.भ.प. दत्तोबा महाराज मालपोटे ह.भ.प प्रकाश महाराज शिंदे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार स्व. सुकनजी बाफना, वारी सेवा रत्न पुरस्कार डॉ. विकेश मुथा, गोमाता रक्षण वीर पुरस्कार पवन ढेरेगे, तर विशेष कार्य गौरव पुरस्कार सह्याद्री विद्यार्थी अकादमी व सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास शंकरराव शेळके, डॉ. विकेश मुथा, ह.भ.प. दत्तात्रय लालगुडे, विवेक इनामदार, गुलाब म्हाळसकर, संतोष कुंभार, गजानन शिंदे, अभिमन्यू शिंदे, रामदास वाडेकर, हर्षद गरुड, ह.भ.प. दत्तात्रय शिंदे, सौ. विमल मोहन वाघमारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन वाघमारे, उपाध्यक्ष प्रफुल्ल ओव्हाळ, सचिव उत्तम ठाकर, सल्लागार सुभाष भोते, सल्लागार सचिन शिंदे, संघटक अनिल घारे, खजिनदार शिवानंद कांबळे, पत्रकार परिषद प्रमुख मंगेश आखाडे, ज्ञानेश्वर वाघमारे, संकेत जगताप, सागर शिंदे, विशाल कुंभार आणि दिलीप कांबळे यांच्यासह संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पाऊलवाट नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, समतेचा, बंधुभावाचा आणि माणुसकीचा अखंड प्रवाह आहे. या प्रवाहाला आपल्या आयुष्याची वर्षे अर्पण करणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या सेवेला समाजाच्या वतीने कृतज्ञतेची मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमास वारकरी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

