वडगाव मावळ, दि. २१ (प्रतिनिधी) – आमदार सुनील शंकरराव शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याविषयी सोशल मीडिया व फेसबुकवर काही फेक अकाउंट्सद्वारे बदनामीकारक पोस्ट प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर अशा पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये, त्यावर वादविवाद करू नयेत आणि त्या पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना केले आहे.
सोशल मीडियावर खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टमुळे विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा पोस्टकडे दुर्लक्ष करून संयम राखावा. कोणत्याही प्रकारे संबंधित पोस्टला प्रतिसाद देऊन वाद वाढवू नये, असे खांडगे यांनी म्हटले आहे.
पक्षाची प्रतिष्ठा, नेत्यांचा सन्मान आणि संघटनेतील एकजूट जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पक्षाची ताकद ही एकजूट, संयम आणि जनसेवेत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील निरर्थक वादात वेळ न घालवता पक्षाचे काम आणि जनसेवेला प्राधान्य द्यावे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन गणेश खांडगे यांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश
– लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’
– जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी
