Dainik Maval News : मावळ तालुक्यातील राष्ट्रीय कुस्ती पंच व महाराष्ट्र चॅम्पियन पै. ॲड. पप्पू (पोपट ) नथु कालेकर यांची १९ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक तृतीय श्रेणी कुस्ती पंच परीक्षेसाठी निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र चॅम्पियन पै. प्रविण रामभाऊ राजिवडे यांनी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कुस्ती पंच परिक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत पंच परिक्षा अव्वल श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
पप्पू कालेकर यांची इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती पंच परिक्षेसाठी निवड झाल्याबद्दल तसेच प्रविण राजिवडे यांनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती पंच परिक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. प्रथम श्रेणी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे तांत्रिक प्रमुख, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित प्रा. दिनेश गुंड यांचे दोघांना मोलाचे सहकार्य लाभले.
त्यांचे ऑलिम्पिकवीर व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. मारुती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस व हिंद केसरी पै. योगेश दोडके, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप आप्पा भोंडवे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व दादोजी कोंडदेव पुरस्कार सन्मानित पै. विलास कथुरे, पुणे कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पै. मेघराज कटके, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, कुस्तीगीर संघाचे सचिव आणि राष्ट्रीय कुस्ती पंच पै. बंडू येवले यांच्यासह मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
