Dainik Maval News : शिरोटा वन बचाव संघाच्या वतीने थोरण–खंडशी गावात आयोजित करण्यात आलेली जनजागृती बैठक उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या बैठकीला गावातील ग्रामस्थ, महिला आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ‘टाटा गो बॅक!’ अशा घोषणा देत टाटा कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाचा निषेध नोंदवला. सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचे, जंगलाचे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
विशेष म्हणजे, आगामी काळात जंगलतोड रोखण्यासाठी चिपको आंदोलन करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली. एकही झाड तोडू देणार नाही, जंगल वाचवण्यासाठी शेवटपर्यंत उभे राहू, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामस्थांचा स्पष्ट संदेश आहे की, आम्हाला विकासाच्या नावाखाली जंगलाचा विनाश नको. रोजगाराच्या आश्वासनांपेक्षा आमच्या पुढील पिढ्यांसाठी निसर्ग, पाणी, जंगल आणि सह्याद्री अधिक महत्त्वाचा आहे. ही केवळ एका गावाची लढाई नाही, तर मावळच्या निसर्गसंपदेच्या संरक्षणासाठी उभा राहिलेला जनआवाज आहे.
शिरोटा वन बचाव संघ – मावळ
शिरोटा वनबचाव संघ च्या वतीने धनंजय शेंडबळे,महेश महाजन,शैलेश जाधव, शंकर रेणुसे, adv पावले, बबन आलम, अमोल ठाकर, धनंजय गाडे, थोरण ग्रामस्त गणपत सावंत, शशिकांत ठाकर( मा.सरपंच) भीमराव ठाकर, काळूराम ठाकर, अरुण ठाकर, महेंद्र ठाकर(पोलीस पाटिल), अंकुश मांडूळे, अंकुश कदम, सोमनाथ ठाकर, मोहन सोनवणे, साबाजी मांडूळे, हनुमंत ठाकर, अनंत कुटे, सखाराम राचकर इत्यादी मान्यवर व महिला उपस्थित होत्या.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश


