व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, November 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यातील ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोफत धान्य मिळणार ; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांसाठी माणशी पाच किलो धान्य

आधार सीडिंग पूर्ण झालेल्या शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वाटप करण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 28, 2026
in महाराष्ट्र
Farmers in 33 districts of maharashtra will receive free food grains in light of drought

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याचा फायदा राज्यातील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ५ कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य तर १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रूपये दिले जातात. दोन्ही योजनांचा लाभ न मिळणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा विचार करून त्यांनाही दर महिन्याला माणशी पाच किलो अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे धान्य पुढील तीन महिन्यांसाठी वितरित करण्यात येईल. तसेच त्यापुढील काळासाठी आढावा घेऊन योजना सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचा लाभ तसेच एपीएल-डिबीटी योजनेचा रोख लाभ मिळत नसलेल्या एकूण ३३ जिल्ह्यांतील ४२,३०,७८३ शेतकऱ्यांना दरमहिन्याला माणशी ५ किलो (३किलो तांदूळ + २ किलो गहू) या प्रमाणात ३ महिन्यांकरिता मोफत धान्य देण्यात येणार आहे.

आधार सीडिंग पूर्ण झालेल्या शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वाटप करण्यात येणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण करून घेतल्यानंतरच त्यांना बायोमेट्रिक पडताळणीद्वारे हे धान्य देण्यात येईल. या मोफत धान्य वितरणाकरिता आवश्यक असणारे अतिरिक्त नियतन केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून मागणी करण्यास मान्यता देण्यात आली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश
– पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे
– मावळ तालुक्यात अत्याधुनिक बस थांबे उभारण्यासाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांनी मानले राज्य सरकारचे आभार


dainik maval jahirat

Previous Post

पुणे शहरासह जिल्ह्यात कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers in 33 districts of maharashtra will receive free food grains in light of drought

राज्यातील ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोफत धान्य मिळणार ; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांसाठी माणशी पाच किलो धान्य

November 28, 2026
No criminal tendencies will be tolerated in Pune city or district said DCM Sunetra Pawar

पुणे शहरासह जिल्ह्यात कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार

November 27, 2026
4538 trees planted total count of abhang contained in Tukaram Gatha In Dehu

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तुकाराम गाथेतील अभंग संख्येइतक्या वृक्षांची लागवड

November 27, 2026
Sunetra Pawar first female Deputy Chief Minister of Maharashtra will be honored with Maharashtrachi Karmayogini award in maval

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचा ‘महाराष्ट्राची कर्मयोगिनी’ पुरस्काराने होणार सन्मान

November 27, 2026
Development works in vicinity of Shri Ekvira Devi Temple including widening of roads stairs are set to be completed soon

श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण, पायऱ्यांचे रुंदीकरण आदी विकासकामे लवकरच पूर्ण होणार ; जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

November 27, 2026
Lohagad-Fort

संविधान दिनानिमित्त गुरुवारी किल्ले लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान ; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे होणार सामूहिक वाचन

November 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.