31 डिसेंबरची मध्यरात्र, घड्याळाच्या काट्याने बाराचा आकडा गाठला आणि संपूर्ण देशात नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरु झाला. डीजेचा धमाका, फटाक्यांची आतिषबाजी आणि हॅपी न्यू इयरची आरोळी देत सगळीकडे अतिशय आनंदात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. ( New Year 2023 Celebration Photos From Maval Taluka Lonavala Pavana Lake Camp Pune Maharashtra )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नववर्षाचे स्वागत खास ठिकाणी करण्यासाठी अनेकांनी कुटुंबीयांसोबत डेस्टिनेशन सिलेक्ट करत पर्यटन वारी केली. यात पर्यटकांचे ऑल टाईम फेवरेट डेस्टिनेशन असलेल्या मावळ तालुक्यात तर पर्यटकांचा महापूर आल्याचे दिसून आले.
मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, पवनाधरण परिसर, कृषी पर्यटन, कुंडमळा, वाडिवळे धरण, आंध्रा धरण, डोंगराच्या कुशीतील हॉटेल्स, व्हिला आदी सर्व ठिकाणी पर्यटकांची फुल टू हजेरी लावली होती. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री हा संपूर्ण भाग जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत न्हावून निघाल्याचे दिसून आले.
येथील सर्व नागरिकांनी आणि गावखेड्यातील नागरिकांनीही वर्ष 2022 ला निरोप देत 2023 चे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. सध्या या ठिकाणचे फोटो, व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत.
अधिक वाचा –
– लोणावळा शहर पोलिसांची खंडाळा येथे मोठी कारवाई! 68 हजारांचा दारूसाठा जप्त
– कोरोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट समोर, लस घेतली असेल तरीही होऊ शकते लागण, वाचा अधिक
– अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना गुन्हेगारी, विकासकामांच्या मुद्यांवर आमदार सुनिल शेळके सभागृहात आक्रमक – व्हिडिओ