किरकोळ वादातून तिघांना पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (31 डिसेंबर) रात्री लोणावळा येथे घडली. या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आतिश किसन गुप्ता (वय 33, रा. गवळीवाडा, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ( Three People Beaten Up By Tourists Over Petty Dispute In Lonavla Case Registered Against Eight Peoples )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार या प्रकरणी दिलशाह हुसेन अहमद खान (वय 26, रा. जय संतोषी माता नगर, घाटकोपर, मुंबई), फजलशहा फरियादअली शहार (वय 21, रा. साकीनाका, मुंबई), इम्रान महंमद इब्राहीम शेख (वय 19, रा. घाटकोपर मुंबई), मैफुस आलम कमालुद्दीन खान (वय 26, रा. घाटकोपर मुंबई), खालीद इस्माईल शेख (वय 22, रा. घाटकोपर, मुंबई), तुषार तात्याराव वाव्हाळे (वय 21, रा. साकीविहार रोड, मुंबई), दिव्या कैलास यशवंते (वय 20 रा. घाटकोपर मुंबई) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी लोणावळ्यात फिरायला आले होते. आतिश गुप्ता, धनंजय गवळी, प्रणय गवळी हे शनिवारी (31 डिसेंबर) लोणावळ्यातील गवळीवाडा नाका परिसरात थांबले होते. त्यावेळी किरकोळ वादातून आरोपींनी गुप्ता, गवळी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– मोठी कारवाई! लोणावळ्यात वेश्याव्यवसाय प्रकरणी हॉटेलवर छापा, दोन महिलांची सुटका
– लोणावळा शहर पोलिसांची खंडाळा येथे मोठी कारवाई! 68 हजारांचा दारूसाठा जप्त