व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्तुत्य उपक्रम! तळेगाव दाभाडे येथील एमएसईबी तळ्यात 5 हजार मत्स्यबीजांचे रोपण

एमएसईबी तळे म्हणून परिचित असलेला तळेगाव स्टेशन विभागातील हा जलाशय 1983 पर्यंत नितळ आणि निर्भेळ पाण्यामुळे स्थानिक तसेच स्थलांतरीत विदेशी पक्षांनी गजबजून जायचा.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 2, 2023
in मावळकट्टा, लोकल, शहर
Plantation-Of-Fish-Seeds

Photo : Plantation Of Fish Seeds At Talegaon Dabhade


तळेगाव स्टेशनच्या एमएसईबी तळ्यात तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दिनांक 31 डिसेंबर) रोजी स्थानिक माशांच्या रोहू, कटला, मृगाल या प्रजातींचे 5 हजारांहून अधिक मत्स्य बीज सोडण्यात आले. ( Plantation Of Five Thousand Fish Seeds In The Pond At Talegaon Dabhade Maval )

एमएसईबी तळे म्हणून परिचित असलेला तळेगाव स्टेशन विभागातील हा जलाशय 1983 पर्यंत नितळ आणि निर्भेळ पाण्यामुळे स्थानिक तसेच स्थलांतरीत विदेशी पक्षांनी गजबजून जायचा. डॉ. सलीम अली हे याच तळ्यावर कधीकाळी पक्षी निरीक्षणासाठी यायचे. येथे युरोपवरून तलवार बदक (पिन्टेल्ड डक) मोठ्या संख्येने हिवाळ्यात स्थलांतर करून येत असत. वाढत्या शहरीकरणामुळे नंतर हळूहळू हे तळे जलप्रदूषणाच्या विळख्यात अडकत गेले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र, आता याच तळ्याला नैसर्गिक गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून पहिला अध्याय म्हणून मत्स्य बीज रोपणाने सुरू झाला आहे. यापुढेही आणखी मत्स्य बीज वेळोवेळी सोडण्यात येणार आहे. तळ्यातील जैविक साखळी परिपूर्ण आणि स्वयंभू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा विडा रोटरी क्लब आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने उचलला आहे.

मुख्याधिकारी विजय सरनाईक, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिश होले, प्रकल्प प्रमुख महेश महाजन, मत्स्यतज्ञ शशांक ओगले, डॉ. ज्योती मुंदर्गी, यादवेंद्र खळदे यांच्यासह रोटरी क्लब सदस्य आणि नगरपरिषद अधिकारी मस्यबीज रोपणप्रसंगी उपस्थित होते. रोटरी क्लबचे सचिव कमलेश कारले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष उद्धव चितळे यांनी आभार मानले.

अधिक वाचा –

– भाजपाकडून अटल दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप । Vadgaon Maval
– अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना गुन्हेगारी, विकासकामांच्या मुद्यांवर आमदार सुनिल शेळके सभागृहात आक्रमक – व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात किरकोळ वादातून पर्यटकांकडून तिघांना मारहाण, आठ जणांच्या विरोधात गुन्हा

Next Post

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 : उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maharashtra-State-Olympic-Games-Pune

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 : उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.