व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहराजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, तळेगावमधील युवक जागीच ठार । Accident Braking

ही धडक एवढी भीषण होती की, मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 3, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident

File Photo : Accident Image


लोणावळा शहराजवळ सोमवारी (दिनांक 2 जानेवारी) मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर सकाळच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तळेगाव दाभाडे येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले. दीपक अशोक नाटक (वय 27, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ( Fatal Accident On Mumbai Pune Expressway Near Lonavla City Youth From Talegaon Dabhade Killed On The Spot )

तर, राहुल कैलास जाधव (वय 28, रा. तुकारामनगर, पिंपरी), जालिंदर बापू पवार (वय 51, रा. खंडोबा माळ, आकुर्डी), रोहन भगवान वाघमारे (वय 28, रा. पिंपरी) हे तिघे जखमी झाले आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी लोणावळ्यातील तुंगार्ली गावच्या हद्दीत मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारच्या (एमएच 14 जेएक्स 9385) चालकाचे भरधाव वेगामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर (आरजे 06 जीबी 7787) मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला होता. यात दीपक नाटक यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले.

अधिक वाचा –

– लोणावळ्यात किरकोळ वादातून पर्यटकांकडून तिघांना मारहाण, आठ जणांच्या विरोधात गुन्हा
– मोठी कारवाई! लोणावळ्यात वेश्याव्यवसाय प्रकरणी हॉटेलवर छापा, दोन महिलांची सुटका


dainik maval jahirat

Previous Post

माजी नगरसेवकासह 100हून अधिक कार्यकर्त्यांचा खासदार बारणेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

Next Post

मोठी बातमी! भाजपाचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mla-laxman-jagtap

मोठी बातमी! भाजपाचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.