मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) नाणे मावळ येथील पाले ( Pale Village ) या गावातील एका दुर्लक्षित लेणीमध्ये ( Caves ) प्राचीन मडके, मानवी शरीराचे अवशेष आदी सापडले आहेत. दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी पाले या गावातील गौतम सरोदे आणि निलेश ओव्हाळ हे दोन युवक इथे संशोधन करत असताना त्यांना हे सर्व आढळून आले.
गेल्या अनेक दिवसांपासून दोघे तरुण येथे संशोधनात्मक कार्य करत होते. पाले गावातील लेणी ( Pale Caves ) समोरील एका दुर्लक्षित लेणीत स्वच्छता करत असताना अचानक मानवी शरीराच्या अस्थी आणि प्राचीन मडके ( Ancient Ruins Found ) आढळून आले. यापूर्वी पाले लेणीत आढळलेल्या शिलालेखामुळे इतिहास प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. पाले गावातील लेण्यांचे निर्माण कार्य हे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर अवशेष हे प्राचीन असून याची सूचना पुणे जिल्हा भारतीय पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रामुख्याने या ठिकाणी मानवी दात, कवटी, बर्गड्याचा तुकडा इत्यादी सापडले आहेत. मातीची भांडी ही खूप प्राचीन वाटत आहेत. ( माहिती स्त्रोत – फेसबुक, बोधी सत्व) ( Ancient Ruins Found In Pale Caves Village In Maval Taluka )
अधिक वाचा –
लोणावळ्यात व्हीपीएस हायस्कूलच्या पोरांचा जोरदार राडा, पाहा तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ
Video : आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नातून नाणे मावळातील बुधवडी गावातील अंधार दुर
धक्कादायक! पौडमधल्या प्रसिद्ध बेकरीच्या खाद्य पदार्थात आढळला टिशू पेपर, तक्रार दाखल