तळेगाव दाभाडे जवळील माळवाडी येथील मनोहर नगर मधील नीम पॅराडाईज सोसायटीत एक पारवा (कबुतर) जातीचा पक्षी मांज्यात अडकून जखमी झाल्याचे तेथील स्थानिक हरिष कापसे यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या प्राणी मित्रांना दिली. त्यानंतर पक्षीमित्र प्रशांत भालेराव आणि गणेश सोंडेकर हे लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या कबुतराच्या पायाला गुंडाळला गेलेला मांजा अलगद दुर केला. त्यानंतर कबुतरावर प्रथमोपचार करुन त्याला निसर्ग अधिवासात मुक्त केले. स्थानिकांनी दोन्ही पक्षीमित्रांचे कौतूक केले. ( Pigeon Stuck In Nylon Thread Rescued By Bird Friend In Malwadi Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नुकताच मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त लहानग्यांपासून वयोवृद्ध नागरिकांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नये, त्याची विक्री देखील करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. परंतू नायलॉन मांजा खरेदी करणारे गिऱ्हाईक आणि ते विक्री करणारे विक्रेते यांच्यात काही घट होताना दिसत नाही. त्यामुळे यंदाही अनेक ठिकाणी पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांज्याचा वापर झाला. त्यातूनच आता तुटलेल्या मांजामुळे पक्षी, वन्यजीव यांना दुखापत होताना दिसत आहे.
अधिक वाचा –
– पवना शिक्षण संकुलात वृक्षारोपण; कार्यक्रमादरम्यान आमदार शेळकेंची खास मागणी आणि मंत्री मुनगंटीवारांचे तात्काळ आश्वासन, वाचा
– मावळ, मुळशीतील नागरिकांसाठी गुडन्यूज! पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग, वाचा सविस्तर