खालापूर तालुका तहसील कार्यालय, खोपोली नगरपरिषद, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आणि के. एम. सी. कॉलेज – खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धाकटी पंढरी – ताकई येथील विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवत आणि बारोमाही वाहणाऱ्या पाताळगंगा नदी पात्राचे पूजन करून पर्यावरप्रेमींना आगळावेगळा संदेश दिला आहे. ( Cleaning of Patalganga River By KMC College Students Khopoli Raigad News )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छ भारत अभियान आणि चला जाणूया नदीला या चळवळी मार्फत के. एम. सी. कॉलेजच्या एन. सी. सी. कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांसाठी शनिवार दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धाकटी पंढरीच्या विठ्ठल मंदिर परिसरात साफसफाई केल्यानंतर पर्यावरणाचे नदीचे सर्वांगीन महत्व जाणून घेत जल प्रदूषण टाळावे हा उद्देश आणि हेतू प्रसारित करण्यासाठी सर्वांनी प्रायोगिक तत्वावर जलपूजन विधीमधे भाग घेतला. मोठ्या संख्येने एन. सी. सी. कॅडेट्स, विद्यार्थी वर्ग आणि खोपोली नगरपालिकेचे सफाई कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.
खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दूरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर समन्वयक भक्ती साठेलकर, के. एम. सी. कॉलेजतर्फे प्राचार्य प्रताप पाटील आणि शीतल गायकवाड यांनी या उपक्रमात उपस्थित दर्शवली. सर्वांनी सर्वाजनिक स्वच्छता आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याची शपथही यावेळी घेतली. पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोविंद जाधव यांनी अशा उपक्रमासाठी आपली संस्था नेहमीच पुढाकार घेईल असे या निमित्ताने अभिवचन दिले. ( Cleaning of Patalganga River By KMC College Students Khopoli Raigad News )
अधिक वाचा –
– माळवाडीत पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतराला पक्षीमित्रांकडून जीवदान । Talegaon Dabhade
– मावळ, मुळशीतील नागरिकांसाठी गुडन्यूज! पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग, वाचा सविस्तर
– मोठी बातमी! शरद पवार यांचा सर्वात जुणा आणि जवळचा सहकारी काळाच्या पडद्याआड