मावळ तालुक्यात 36 सापांची जात आढळून येतात. यातील कोणते विषारी आणि कोणते बिनविषारी यांचे संशोधन मावळ तालुक्यात राहणाऱ्या जिगर सोलंकी आणि रौनक खरे यांनी आत्माराम आंधळे यांच्या निरिक्षणाखाली पूर्ण केले आहे.
36 जातीमधल्या फक्त 8 साप विषारी आणि त्यातून पण फक्त 4 साप प्रामुख्याने लोक वस्तीमध्ये आढळून येतात. नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे 4 साप विषारी आहेत आणि बाकीचे 4 दुर्मिळ आहेत आणि ते जंगल भागात आढळून येतात. प्रामुख्याने 4 विषारी सापांमधला कोणताही साप चावल्यास घाबरून न जाता आणि कोणत्याही अफवेला बळी न पडता जवळच्या रूग्णालयात त्वरित जावे आणि योग्य उपचार घ्यावेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उर्वरित सापांमध्ये सगळ्यात जास्त निघणारे बिनविषारी साप आहेत धामण, दिवड, नानेती, कवड्या, तस्कर, गवत्या आणि वाळा हे साप लोक वस्तीमध्ये सर्वात जास्त आढळून येतात. काही झाडांवर राहणारे साप आहेत, जसे की हरणटोळ, मंजऱ्या, रुका हे पण काही ठिकाणी लोक वस्तीमध्ये आढळून येतात. या सापांपासून लोकांना काहीच जीव धोका नाही. साप खाद्य आणि लपायच्या जागा शोधत लोकवस्तीमध्ये येतात. हे साप जास्तकरून उंदीर, बेडूक, पाल, सरडे आणि काही इतर साप असे त्यांचे खाद्य आहे. ( Information About All Types Of Snakes Found In Maval Taluka Pune )
काही साप असे पण या संशोधनामध्ये आढळून आले की, ते फक्त जंगल भागात आढळून आलेत, लोक वस्ती मध्ये नाही. जिगर आणि रौनक यांनी मावळ तालुक्यातील जवळपास सगळ्या भागात सर्व्हे केला आहे. त्यांनी हा सर्व्हे केलाय ज्यातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि कोणाचीही सर्पदंशाने मृत्यु न व्हावा.
हेही वाचा – माळवाडीत पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतराला पक्षीमित्रांकडून जीवदान । Talegaon Dabhade
आपल्या भागात सर्व साप विषारी नाहीत, हे लक्षात ठेवून आपण सावध राहून आपले काम केले पाहिजे. बाहेर फिरताना पायात बुट, रात्री जाताना टॉर्च, जमिनीवर झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या बाजूला कचरा न करावा, घरात किंवा घराच्या बाहेर जे काही बिळे असतील ते सगळे पॅक करावे, अडचण तयार करू नये याची काळजी घ्यावी. ( Snakes Found In Maval Taluka Pune Information Collected By Jigar Solanki And Raunak Khare )
निसर्गाच्या हानीमुळे खूप साप लोकवस्ती कडे येऊ लागले आहेत आणि काही साप दुर्मिळ किंवा नष्ट होत आहेत. सापांची अन्नसाखळीमध्ये खूप मोठी भूमिका आहे. या संशोधन साठी वनविभाग मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी संशोधकांना मदत केली. याचे पूर्ण संशोधन cibtech journal of zoology volume 11 या जर्नल मध्ये हे पब्लिश झाले आहे, जे सर्वजन ऑनलाईन पाहू शकतात. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी ही माहिती दिली.
अधिक वाचा –
– गोडुंब्रेमध्ये रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान; वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट
– मावळ तालुका हादरला! मावस भावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस
– लोणावळा परिसरात फिरायला गेलेल्या सलमान खानला लुटले; तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल