खोपोली (जि. रायगड) जांभुळपाडा लोहाणा महाजन ट्रस्ट, आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल – नवीन पनवेल, टाटा मेमोरियल सेंटर – मुंबई, ओनकॉलॉजी सर्व्हिसेस – खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन 23 जानेवारी रोजी केले गेले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खोपोली शहर उपाध्यक्ष संजय त्यांना यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. ( Eye Check Up Cataract Surgery And Cancer Check Up Camp Held In Khopoli City By MNS Raigad )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर शिबिराला खोपोली शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलने साधारण 300 जणांनी नेत्र तपासणी केली तर मागील शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या 50 हून अधिक जणांनी तपासणी करून घेतली. या शिबिरात 32 नवीन मोतीबिंदूचे निदान झालेल्यांवर शस्त्रक्रिया करण्याकरिता नवीन पनवेलमधील शंकरा आय हॉस्पिटल येथे नेण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार करून दोन दिवसांनी डिस्चार्ज दिला जाणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर – मुंबई, ओनकॉलॉजी सर्व्हिसेस – खोपोली यांच्या कडून जवळपास 100 जणांची कर्करोग तपासणी करण्यात आली त्यात आढळलेल्या कर्करोग झालेल्या 3 रुग्णांना पुढील उपचासाठी सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.
हेही वाचा – के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक स्वच्छतेसोबत पाताळगंगा नदीचे केले पूजन । Khopoli News
अशाच स्वरूपाच्या भव्य शिबिराचे आयोजन करून खोपोली शहर आणि तालुक्यातील नागरिकांना जास्तीत लाभ घेता येईल याकडे कटाक्ष असेल असे लोहाणा महाजन ट्रस्टच्या शैलेश विठलानी यांनी प्रतिपादन केले. निःशुल्क स्वरूपात सेवा देण्याचा संकल्प आणि अश्या शिबिराच्या आयोजनातून मिळणारे मानसिक समाधान खूप मोठे असल्याने आयोजनात अमाप उत्साह दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
खोपोली शहरातील राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील कुलदीपक शेंडे, किशोर पानसरे, सुभाष पोरवाल, गुरुनाथ साठेलकर, शेखर जांभळे. मोहन केदार, मंगेश काळोखे, अजय इंगुलकर, महेश काजळे यांनी शिबिराला भेट दिली. खोपोली जांभुळपाडा लोहाणा महाजन ट्रस्टचे सदस्य प्रवीण उर्फ पंडित शाह, राजू ठक्कर, राजेश अभाणी, जयेश ठक्कर, मितेश शाह, मनीष विठलानी, पंकज विठलानी, मनीष ठक्कर, अल्पेश शाह, दिनेश कारिया,महेश चौहान इत्यादींनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. ( Eye Check Up Cataract Surgery And Cancer Check Up Camp Held In Khopoli City By MNS Raigad )
अधिक वाचा –
– बाळाराम पाटलांसाठी शेकापचे जयंत पाटील मैदानात – पाहा व्हिडिओ
– उल्हास देशमुख यांनी उघडला आठवणींचा पेटारा – पाहा व्हिडिओ