केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज (बुधवार, दि 1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा हा निवडणूकपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने सर्वांचेच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते. नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे, तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.
आज (बुधवार) सकाळी राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला औपचारिक मंजूरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाही सितारमन यांनी डिजीटल पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला. ( Big Announcements For Health Sector In Union Budget 2023 157 New Nursing Colleges Will Be Set Up In Country )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभारणार
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना वैद्यकीय क्षेत्राबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात प्राधान्याने देशात 157 नर्सिंग कॉलेजेस उभारणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री सितारमन यांनी केली. देशात 2014 पासून उभारण्यात आलेल्या रुग्णालयांसोबतच 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभारले जातील, असे सितारमन म्हटल्या. यासह ICMR च्या प्रयोगशाळांमध्ये खासगी कॉलेज, परदेशी शास्त्रज्ञांना देखील परवानगी मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली. यासह देशात औषधी संशोधनात गुंतवणुकीसाठी कंपन्यांना आवाहन करणार असल्याचे सरकारतर्फे त्यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील ही बाब अत्यंत दिलासादायक मानावी लागेल.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांची सुरुवातीला महत्वाची माहिती….
अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच, भारताच्या “अमृतकाळातलं” पहिलं अर्थसंकल्पीय भाषण असल्याचे सांगताना भारताच्या 100व्या वर्षाच्या वाटचालीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असेल असे निर्मला सितारमन म्हणाल्या. तसेच, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देताना, PM आवास योजना, किसान सम्मान निधी, कोरोना लसीकरण आदींची माहिती सभागृहाला दिली. ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण, हस्तकलेच्या कलाकारांना बळ, पर्यटनाला प्रोत्साहन आणि ग्रीन ग्रोथ या चार गोष्टी अमृत काळात पुढे जाताना महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारची आदिवासी समुदायांसाठी मोठी घोषणा, देशात पीएम पीव्हीटीजी योजना राबवणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारचे ‘मिशन सप्तर्षी’, ‘या’ सात घटकांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प, जाणून घ्या