आजिवली -जवण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नितीन लायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच अमोल गोणते यांनी पदाचा निश्चित कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पदासाठी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक पार पडली. यात प्रतिस्पर्धी रुपाली लायगुडे यांना एका मताने हरवत नितीन लायगुडे हे सरपंचपदी विराजित झाले आहेत. ( Nitin Laigude Elected as Sarpanch of Ajivali Javan Gram Panchayat Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेत नितीन लायगुडे यांना एकूण 4 तर रुपाली लायगुडे यांना 3 मते मिळाल्याने सरपंचपदी नितीन लायगुडे यांची निवड झाल्याचे मंडल अधिकारी पी. बलकवडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेविका जयश्री चव्हाण यांनी जाहीर केले. यावेळी माजी सरपंच अमोल गोणते, आशा भिकोले, मनीषा जाधव, सचिन शिंदे, रुपाली लायगुडे आदी हे सर्व सदस्य उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते नितीन लायगुडे यांची ग्रुप ग्रामपंचायत अजिवली-जवणच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार बाळा भेगडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि अभिनंदन केले. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे यांसह, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, दत्ता गुंड, किरण राक्षे, नितीन घोटकुले, राजु सातकर, गणेश ठाकर आदीजण उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शिळींब गावात भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; अनिकेत घुलेंकडून कार्यक्रमासाठी शिवरायांची आकर्षक मूर्ती भेट
– कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीसाठी बाळा भेगडे भाजपचे स्टार प्रचारक, पक्षाकडून 40 नावांची यादी जाहीर, वाचा