मावळ तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका. या तालुक्यातील पवनमावळ भागातील मौजे शिळींब गावात मागील अनेक वर्षांपासून शिवराय फ्रेंड्स सर्कल शिळींब , गावठाण यांच्याकडून शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यंदाचा होणारा शिवजयंतीचा सोहळा हा देखील अतिशय भव्यदिव्य असा असणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. ( Shivaray Friends Circle Shililmb Gaonthan Organizes Shiv Jayanti Celebrations In Village Aniket Ghule Gifted An Idol of Shivaji Maharaj )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाचे म्हणजे युवासेनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिकेत घुले यांच्याकडून कार्यक्रमाकरिता छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक भव्य अशी शिवमूर्त मंडळाला देण्यात आली आहे. पै अनिकेत घुले यांच्या या सेवाभावाचे आणि मदतीचे शिवराय फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी मनापासून आभार मानले. गुरुवार (9 फेब्रुवारी) रोजी शिवरायांची मूर्त घुले यांनी कार्यकर्त्यांकडे सोपवली. यावेळी शिवरायांचा जयघोष करत मोठ्या उत्साहात ही शिवमूर्त शिळींब येथे नेण्यात आली.
शिवराय फ्रेंड्स सर्कलकडून भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन…
मंडळाचे हे शिवजयंतीचे सहावे वर्ष असून यंदा मोठ्या थाटात शिवजयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहाटे शिवज्योत आणण्यापासून रात्री शिवव्याख्यान आणि महाअन्नदान आदी अनेक कार्यक्रम यात समावेश आहेत.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके बनले राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, पोटनिवडणूकीसाठी पक्षाकडून 20 नावे जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– ‘आय लव्ह यू’ लिहित अल्पवयीन तरुणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्या तरुणाविरोधात शिरगाव पोलिसात गुन्हा