लोणावळा शहरात प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी आठवडे बाजार भरत असतो. मात्र, उद्या म्हणजेच दिनांक 10 फेब्रुवारी रोजी होणारा आठवडे बाजार नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आला आहे. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी ही माहिती दिली. ( Lonavala City Friday Weekly Market Closed Due To Road Construction )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने भांगरवाडीत भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच सर्व वाहतूक ही पुरंदरे शाळा मैदानासमोरील रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. वाहतूक या मार्गाने वळवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी शुक्रवारचा आठवडे बाजार रद्द करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे गेल्या आठवड्यातही बाजार रद्द करण्यात आला होता. ( Lonavala City Friday Weekly Market Closed Due To Road Construction )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके बनले राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, पोटनिवडणूकीसाठी पक्षाकडून 20 नावे जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– खंडाळा बोगद्यासमोर डस्टर कारला अचानक आग – पाहा व्हिडिओ