मावळ तालुक्यात ( Maval News ) अवैध रित्या गांजा या अंमली पदार्थाची होणारी विक्री काही केल्या कमी होताना दिसत नाही. मंगळवारी (14 फेब्रुवारी) रोजी तालुक्यातील ( Maval Crime ) मौजे बधलवाडी गावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ( One Person Arrested At Badhalwadi In Maval Taluka In Connection With Sale Of Illegal Ganja )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बधलवाडी गावातील सुनिल पोल्ट्री फार्मच्या समोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका गोठ्यात अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार कारवाई करण्यात आली. कारवाईत आरोपी प्रविण प्रकाश बधाले याच्या ताब्यातून एकुण 28,975 रुपये किंमतीचा माल ज्यामध्ये 953 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, मोबाईल आणि रोख रक्कम अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या विक्री करिता कब्जात बाळगताना आढळून आला, जो जप्त करण्यात आला आहे.
तसेच प्रविण प्रकाश बधाले (वय 28 वर्षे, रा. मु. बधलवाडी, पो. नवलाख उंबरे ता. मावळ जि. पुणे) याला अटक करण्यात आली असून तळेगाव एमआयडीसी ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 20 (ब) (आय आय ) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर परशुराम भुजबळ (पोलीस हवालदार, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. पुढील तपास पोउपनि आहिरे हे करित आहेत.
अधिक वाचा –
– जांभूळ गावातील पापड उत्पादक गटाच्या महिलांना हॅन्ड इन हॅन्ड संस्था आणि बेलस्टार यांच्याकडून मोठी मदत
– खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश; मतदारसंघातील ‘या’ विकासकामासाठी राज्य सरकारकडून 47 कोटींचा निधी