लोणावळा शहरातीत ( Lonavla City ) व्हीपीएस विद्यालय ( VPS School ) इथे काही दिवसांपूर्वी शालेय आवारात मुलांची गलिच्छ शिव्या देत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शालेय परिसरात घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून अशा प्रकारामुळे शाळेचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी आता पोलिसांनी ( Lonavala City Police ) लक्ष घालणे आवश्यक असल्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
व्हीपीएस विद्यालय ही संस्था फक्त लोणावळाच नाही तर मावळ तालुक्यातील आतिशय नामांकित असून या शाळेतून आजवर दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, सरकारी सेवक बनले असून इतरही अनेक क्षेत्रात नाव गाजवत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मात्र, अलीकडे शालेय परिसरात घडत असलेल्या गैरप्रकारांमुळे शाळेची बदनामी होत असून असे प्रकार थांबवण्यासाठी कठोर उपाय योजना करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे लोणावळा शहर पोलीस स्टेशन खात्यामार्फत शालेय भागात भरारी पथक ( Special Teams To Patrol ) नेमून गस्ती घालावी, अशा मागणीचे निवेदन मावळ भाजपा विद्यार्थी आघाडी, लोणावळा युवा मोर्चा यांच्या वतीने देण्यात आले.
हेही वाचा – लोणावळ्यात शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला! खुन्नसने हल्ला झाल्याचा वडीलांचा आरोप
मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, लोणावळा शहर युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, विद्यार्थी आघाडी आंदर मावळ अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, लोणावळा युवा मोर्चा कार्याध्यक्ष शुभम दाभाडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ( Lonavala City Police Demand Appoint Special Teams To Patrol Area Of VPS Vidyalaya Lonavala )
अधिक वाचा –
लोणावळा येथे मोठी चोरी; चोरट्याकडून महागड्या वस्तूंसह रोख रक्कम लंपास, गुन्हा दाखल
लोणावळा गणेश विसर्जन मिरवणूक : गणेशभक्तांसोबत आमदार शेळकेंनी धरला ठेका, जल्लोषाचा Video व्हायरल