देशसेवेसाठी दिव्यांग पत्करलेल्या कमांडो बांधवांना ‘हिरो डेस्टनी 125’ या खास दिव्यांग बांधवांसाठी बनवलेल्या दुचाकी भेट देण्यात आल्या. तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफचे चार दिव्यांग कमांडो बांधवांना खांडगे हिरोच्या दालनात हिरो मोटोकाॅपच्या वतीने या दुचाकी गाड्या भेट देण्यात आल्या. मेजर रामदास भोगडे, मेजर अजिनाथ शिरसाठ, मेजर शंकर वरकट, मेजर जनार्दन सोनवणे या चार दिव्यांग कमांडो बांधवांना विशेष दुचाकी भेट देण्यात आल्या. ( Talegaon Dabhade Khandge Automobile Hero MotoCorp Gifted Special Two Wheeler To Disabled CRPF Commando )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कमांडो बांधवांनी त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. देशासाठी जिंकायचे आहे, असा निर्धार व्यक्त केला. दिव्यंगत्व आलं तरीही आम्ही खचलेलो नाही आणि डगमगलो देखील नाही. लढणे हे आमच्या रक्तातच आहे, असे कमांडो यावेळी म्हणाले. तर, देशासाठी लढणाऱ्या सैन्याच्या ऋणातून उतराई होण्याची ही संधी खांडगे हिरो आणि अनु ग्रुपला मिळाली, असे खांडगे यांनी यावेळी म्हटले.
अगदी छोटेखानी झालेल्या या समारंभाला गणेश खांडगे, अनुपमा गणेश खांडगे, सुभेदार मेजर टी. आर. चौधरी, हवालदार अनिल कोलते, हिरो मोटोकॉपचे पंकज खोडे, सुहास गरूड, उद्योजक आदित्य खांडगे, उद्योजक सत्यम खांडगे, खांडगे हिरो आणि अनु ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. ( Talegaon Dabhade Khandge Automobile Hero MotoCorp Gifted Special Two Wheeler To Disabled CRPF Commando )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे पोलिसांचे बांधकाम व्यावसायिकांना महत्वाचे आवाहन, ‘जर कुणीही….’
– सोमाटणे येथील गीता विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्याचे जेईई परीक्षेत घवघवीत यश, शाळेकडून दुचाकी भेट