दिवड येथील श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी वर्गाचा आज (सोमवार, 27 फेब्रुवारी) निरोप समारंभ होता. या निरोप समारंभाला भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भेगडे यांनी दिवड येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इमारतीची आवश्यकता लक्षात घेऊन स्व. माजी आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. ( 1 Lakh From BJP Maval Taluka President Ravindra Bhegade For Construction Building of Shree Sant Dnyaneshwar Secondary School At Diwad Village )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यासाठी मदत करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शंकर शेलार, संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, संचालक उद्धव शेलार, शिवाजीराव पवार, लहुजी सावळे, महावीर शेठ बरलोटा, मदन सोनिगरा, किसन सावळे, मनोहर भेगडे, मा जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, मा पंचायत समिती सदस्य सचिन घोटकुले, दिवड ग्रामपंचायत चे सरपंच अमोल सावळे, मुख्याध्यापक शशिकांत जाधव, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– लोणावळा शहरातील रिदम हॉटेलसमोर मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन अनोळखी दुचाकीस्वारांचा मृत्यू
– शिळींब गावातील 25 महिलांना केक बनवण्याचे प्रशिक्षण, एकदिवसीय शिबिरात महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे धडे