संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सध्या पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभा पोटनिवडणूकांच्या निकालांकडे लागले आहे. स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या कसबा पेट मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक आणि स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड या मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक. अशा या दोन्ही मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार आणि आमदार म्हणून विधानभवनात कोण जाणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पण एकीकडे निकालाची ही धाकधुक असताना पुन्हा एका पुणेकरांनी पुणे तिथे काय उणे या उक्तीचा परिचय आख्ख्या राज्याला करुन दिलाय. प्रचारावेळी उडालेला सभा, रॅलींचा धुरळा आणि मतदानाच्या दिवशी झालेले राडे, आरोप-प्रत्यारोप, गुन्हे दाखल हे सर्व एका बाजूला सारत पुण्याच्या वडगाव बुद्रुक भागात चक्क एका उमेदवाराचा आमदार पदी निवड झाल्याचा बॅनर लागल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ( Pune Kasba Peth Congress Candidate Ravindra Dhangekar Flex Viral In Vadgaon Budruk Area Before Counting As Elected MLA )
रविंद्र धंगेकर बनले कसब्याचे आमदार!
या फोटोत तुम्ही पाहू शकता की कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे म्हणजेच मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे आमदार म्हणून निवडून आल्याचे लिहून त्यांना शुभेच्छा दिल्याचे दिसत आहे. पुण्याच्या वडगाव बुद्रुक भागातील हा फ्लेक्स आहे. खरंतर मतमोजणीसाठी अद्याप एक दिवस म्हणजे उद्याचा (28 फेब्रुवारी) आख्खा दिवस शिल्लक आहे. असे असताना 1 मार्च म्हणजे मतमोजणीच्या दोन दिवस आधीच रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता हा विश्वास खरा ठरणार की खोटा हे 1 मार्चलाच समजेल.
अधिक वाचा –
– माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविंद्र भेगडेंकडून दिवड येथील शाळेच्या इमारतीसाठी मोलाची मदत
– ‘चला.. पुढे या.. आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत भागीदार व्हा’, मुख्यमंत्री शिंदेंचे राज्यातील तरुणांना आवाहन, वाचा सविस्तर
– नेते हो..! तुम्ही तरी कितीवेळा चिखल तुडवत येणार, रस्त्याचं मनावर घ्या अन् पुढच्यावेळी चारचाकीत बसून मत मागायला या