मावळ तालुक्यातील शिळींब गावात हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेमार्फत बचत गटातील महिलांना केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
मावळ तालुक्यातील शिळींब गावात हॅण्ड इन हॅण्ड इंडिया तळेगाव दाभाडे संस्थेमार्फत बचत गटातील एकूण 25 महिलांना केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांना एक दिवसीय शिबिरात वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा गावातील महिलांना गाव स्तरावरच व्यवसायिकदृष्टया केक तयार करता यावेत, या कौशल्याचा वापर करुन घरगुती गरजा भागवण्याइतपत पैसे कमवता यावे आणि त्यातून या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे हा आहे. ( cake making training to women in shilimb village financial empowerment lessons by Hand in Hand NGO )
प्रशिक्षक सुप्रिया दळवी यांनी हॅण्ड मेड केक कसा तयार करायचा याचे प्रशिक्षण दिले. हॅण्ड इन हॅण्ड संस्थेकडून मोहन सोनवणे, सारिका शिंदे, ऋतुजा धमाले उपस्थित होते. या प्रशिक्षणाला गावातील बचत गटातील महिलांनी सक्रीय प्रतिसाद लाभला.
अधिक वाचा –
– लोणावळा शहरातील रिदम हॉटेलसमोर मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन अनोळखी दुचाकीस्वारांचा मृत्यू
– घरातून निघून गेलेल्या तरुणाचा तळेगाव दाभाडे शहरातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ