मावळ तालुक्यातील ( Maval News ) कार्ला वेहेरगाव येथील श्री एकविरा देवी मंदिराच्या श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली होती, त्यानंतर नवनिर्वाचित विश्वस्त यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. ( Shree Ekvira Devasthan Trust Board of Trustees Met Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी सरपंच व देवस्थान ट्रस्टच्या पदसिद्ध विश्वस्त अर्चना देवकर, नवनिर्वाचित विश्वस्त सागर देवकर, विकास पडवळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. मनसे राज्य उपाध्यक्ष अमेय खोपकर, श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट चे माजी अध्यक्ष विनोद खोपकर आदीजण यावेळी उपस्थित होते.
देवस्थान च्या विकास आाखड्याबाबत राज ठाकरे यांनी यावेळी विश्वस्त आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच, इथुन पुढे देवस्थानला जे काही सहकार्य लागेल त्यावेळी मला संपर्क करा, मी तुम्हाला मदत करेल, असे आश्वासनही राज ठाकरेंनी ग्रामस्थांना दिले.
हेही वाचा – मावळात मनसेचा डंका! वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी सायली म्हाळसकर बिनविरोध
मावळ मनविसेचे अध्यक्ष अशोक कुटे, एकविरा व्यापारी संघटना अध्यक्ष संजय देवकर, संदिप देवकर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. तसेच देवघरचे नवनिर्वाचित उपसरपंच महेंद्र शिंदे, कुरवंडे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य अविनाश जांभूळकर, निलेश पनिकर, जितेंद्र बोरकर यांच्या सह मनसे चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Shree Ekvira Devasthan Trust Board of Trustees Met Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray )
अधिक वाचा –
– श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर
– ‘डान्स मावळ डान्स’ नृत्य आणि चित्रकला स्पर्धेत मावळमधील १३०० युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग