ग्रामीण भागातील महिला या स्वावलंबी व्हाव्यात, आर्थिकदृष्ट्या सबळ व्हाव्यात, यासाठी शासकीय स्तरावर नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम आखले जातात. यासह विविध सामाजिक संस्था देखील महिला सबलीकरणासाठी पुढाकार घेत असतात. रूडसेटी ( Rudseti ) या संस्थेमार्फत नुकतेच मावळ तालुक्यातील गेवरेवाडी येथे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर ( Free Vocational Training Camp ) घेण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था म्हणजेच रूडसेटी, पुणे – महाराष्ट्र यांच्या सहयोगाने गुरुवार 22 सप्टेंबर रोजी मुक्काम पोस्ट गेवरेवाडी ( Gevrewadi ) तालुका मावळ ( Taluka Maval ) येथे महिलांसाठी विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षण आणि जनजागृतीचा कार्यक्रमआयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील आणि परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. ( Free Vocational Training Camp for Women at Gevrewadi Taluka Maval )
अधिक वाचा –
पानसोली, कामशेत-खडकाळा गावच्या दिवंगत पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत
तब्बल 22 वर्षांच्या लढ्याला यश..! शिरे-शेटेवाडी गावातील 105 कुटुंबाचे पुनर्वसन होणार