मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बुधवारी (दिनांक 15 मार्च) रोजी रात्रीच्या सुमारास किलोमीटर 40.00 च्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. अंकुश माने ( सातारा ) असे मृत चालकाचे नाव आहे. ( Truck and Tempo accident on Mumbai Pune expressway driver killed on the spot )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, एम.एच 46 बी.बी. 9673 या ट्रकचा टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे तो शोल्डर लेन वर कडेला उभा होता. त्याला मागून आलेल्या एम.एच. 11 सी.एच. 4172 या वाहनाची पाठीमागून धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की मागच्या वाहनाची केबिन पूर्ण दबली गेली आणि त्यामुळे त्यात अडकून चालकाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. एक्सप्रेस वे वरील मुंबईकडे जाणाऱ्या बाजूस किलोमीटर 40.00 च्या दरम्यान झालेली घटना.
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्गावरील क्रेन ऑपरेटर्स, महामार्गावरील बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, आपदा मित्र आणि अपघातग्रस्तांचा मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्यानी या अपघातात मदत कार्य केले.
खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलि़स पुढील तपास करत आहेत. खोपोली पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन मृत वाहन चालकाच्या कुटुंबाशी संपर्क साधला. चालकाचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगर पालिका रुग्णालयात नेण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– तिकोणा गडावर झील कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून दुर्गसंवर्धनाचे कार्य
– धनघव्हाण गावातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून घरोघरी जलगंगा येणार