व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंना झटका! दिग्गज नेत्याने साथ सोडली, एकनाथ शिंदेंजवळ असलेला भगवा घेतला खांद्यावर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज (बुधवार, 15 मार्च) रोजी मोठा धक्का बसला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 15, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Deepak-Savant-Join-Eknath-Shinde-Party

Photo : Dainik Maval Graphics Team


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज (बुधवार, 15 मार्च) रोजी मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक असलेले आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री राहिलेले दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. ( Shock To Uddhav Thackeray Former Maharashtra Health Minister Deepak Sawant Joins Eknath Shinde Shiv Sena Party )

खरे तर उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी कालच (मंगळवार, 14 मार्च) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता दीपक सावंत यांनीही शिंदेच्या सोबत जाण्याचा निर्णय घेत जाहीर पक्षप्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंना बसलेला हा मोठा झटका मानला जातो.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दीपक सावंत यांनी बाळासाहेब भवन येथे शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांच्या सोबतच ॲड.हर्षल चोरडिया आणि एसटी कष्टकरी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी देखील शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेत प्रवेश केला. यावेळी स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना महिला संघटीका कला शिंदे,अंधेरी विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचे माजी आरोग्यमंत्री तसेच माजी आमदार @drdeepaksawant यांनी आज बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासोबतच ॲड.हर्षल चोरडिया आणि एसटी कष्टकरी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी देखील #शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेत प्रवेश केला.#ShivSena pic.twitter.com/cQoyswXn4h

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 15, 2023

दीपक सावंत यांचा परिचय ;

दीपक सावंत हे विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. जुलै 2004 मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर 2006 आणि 2012 मध्ये ते पुन्हा निवडून आले. डिसेंबर 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

अधिक वाचा –

– तिकोणा गडावर झील कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून दुर्गसंवर्धनाचे कार्य 
– आंदोलनाला मोठे यश! पुढील निर्णय होईपर्यंत सोमाटणे टोलनाक्यावर टोलमाफी, मंत्री रविंद्र चव्हाणांच्या उपस्थित उपोषण स्थगित


Previous Post

तिकोणा गडावर झील कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून दुर्गसंवर्धनाचे कार्य

Next Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Truck-and-Tempo-accident

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Potters will be able to lift clay for 9 months no penalty above 700 brass limit Big decision of Revenue Minister

कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार

May 13, 2026
Livestock farmers take care of your livestock measures if symptoms of heatstroke in livestock

पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा

May 13, 2026
Crime

पाहुणा म्हणून आला आणि घर लुटून गेला, तळेगावमधील धक्कादायक प्रकार

May 13, 2026
Sanskar Foundation provides support to tribal from Sai Village whose house was burnt down in fire

वणव्यात घर जळून खाक झालेल्या साई येथील आदिवासी बांधवाला ‘संस्कार’चा आधार

May 13, 2026
Bhumi Pujan of development works at Joshiwadi Thakarvasti in station area of ​​Talegaon Dabhade

तळेगाव शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

May 12, 2026
maharashtra Govt decision Big relief for farmers stamp duty waiver for crop loans up to Rs 2 lakh

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सभासद शेतकऱ्यांना ३ हजार १५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

May 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.