मुळशी तालुक्यात एक अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना घडली आहे. ओळखीचा फायदा घेत एका 70 वर्षाच्या वृद्धाने तिसरीत शिकणाऱ्या आपल्या नातीसमान अवघ्या 9 वर्षांच्या चिमुरडीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पौड पोलिस स्टेशन इथे दाखल फिर्यादीवरुन संबंधित नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपी आणि पीडित मुलगी हे दोन्ही एकाच गावातील आहेत. ( seven year old girl physically abused by 70 year old man in mulshi taluka pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नाती सामान वय असणाऱ्या नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाविरोधात सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून त्याला कडक शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. या भयानक घटनेचा मुळशी तालुक्यातील विविध पक्ष, संघटना यांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता तिसरीत शिकत आहे. आरोपी त्यांच्या घराशेजारी राहत असून त्याची मुले पुण्यात राहत असल्याने तो घरी एकटाच राहतो. आरोपीने मुलीला गोड बोलत चॉकलेटचे खाऊच्या पदार्थाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पौड पोलीस करत आहेत. ( seven year old girl physically abused by 70 year old man in mulshi taluka pune )
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात, चालक जागीच ठार
– धनघव्हाण गावातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून घरोघरी जलगंगा येणार