एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गावर किलोमीटर 82.00 दरम्यान, उर्से टोलनाक्याजवळ आढे गावाच्या हद्दीत आज (शुक्रवार, 17 मार्च) एक भीषण अपघात घडला आहे. एका मालवाहतूक ट्रकला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार क्रमांक एम.एच. 04 जे.एम. 5349 ही किलोमीटर 82.00 च्या दरम्यान समोरच्या ट्रक क्रमांक आर.जे. 09 जी.बी. 3638 याला मागून जोरदार धडकली. ही धडक एवढी भीषण होती की त्यातील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा, पवना हॉस्पिटलची राणी अॅम्बुलन्स या अपघातात मदत कार्य करत होते. महामार्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली यातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. ( Car and truck accident on Mumbai Pune Expressway Three dead on the spot accident occurred near Urse toll plaza )
अधिक वाचा –
– अत्यंत दुःखद बातमी! मावळ तालुक्यातील ‘त्या’ जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू, शिलाटणे गावावर शोककळा
– दुर्दैवी घटना! अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरचा अपघात, दोन जवान शहीद, शोधकार्यानंतर अवशेष सापडले
– ‘माझ्या मावळच्या भूमीपुत्रांना बोटींग व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या’ – आमदार सुनिल शेळके