व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बिल्डर्स सुविधा देत नाही, तरीही पीएमआरडीएकडून सदनिका पूर्णत्वाचा दाखला मिळतोच कसा? – आमदार शेळके

बिल्डर्सकडून सदनिकेतील रहिवाशांना योग्य पाणी पुरवठा दिला जात नाही, ड्रेनेजची व्यवस्था केली जात नाही, काही ठिकाणी रस्ता दिला जात नाही. मग हा पुर्णत्वाचा दाखला कशाच्या आधारे दिला जातो? असा सवाल सुनिल शेळकेंनी अधिवेशनादरम्यान सभागृहात केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 19, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, व्हिडिओ
MLA-Sunil-Shelke

MLA Sunil Shelke


पीएमआरडीए हद्दीत उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पांना पुर्णत्वाचा दाखला पीएमआरडीए कडून दिला जातो. संबंधित बिल्डर्सकडून सदनिकेतील रहिवाशांना योग्य पाणी पुरवठा दिला जात नाही, ड्रेनेजची व्यवस्था केली जात नाही, काही ठिकाणी रस्ता दिला जात नाही. मग हा पुर्णत्वाचा दाखला कशाच्या आधारे दिला जातो? असा सवाल सुनिल शेळकेंनी अधिवेशनादरम्यान सभागृहात केला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

बिल्डर्स, ग्रामसेवक, अधिकारी संगनमत करुन अशा गोष्टी करीत आहेत, असे निदर्शनास येत आहे. असे सांगताना सुनिल शेळके यांनी, सोमाटणे, गहुंजे इ. भागात ज्या टाऊनशिप उभ्या राहिल्या आहेत. त्यांना पाणी, रस्ते, ड्रेनेज अशा मुलभुत सुविधा दिल्या जात नाही. या गृह प्रकल्पामधून निघणारे सांडपाणी थेट इंद्रायणी, पवना नदीपात्रात सोडले जाते. अशा पद्धतीने चुकीचे काम करणाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? अशा प्रकरणांची चौकशी आपण करणार का? अशी मागणी आमदार शेळकेंनी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे मंत्री महोदयांकडे केली. ( MLA Sunil Shelke Raised Question In Session Regarding Various Issues of Flat Holders And Mismanagement of PMRDA )

त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, अशा प्रकरणांची चौकशी झालीच पाहिजे. काही अनियमितता असेल तर सुधारणा केली गेली पाहिजे. नदीपात्रात दूषित पाणी सोडणे चुकीचेच आहे. त्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर आठ दिवसांत समिती गठीत करण्यात येईल व त्यांना दोन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली जाईल. त्यामध्ये PMRDA आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आयुक्त, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश यामध्ये केला जाईल. ग्रामीण भागातील प्रश्न असेल तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीमध्ये घेतले जातील. या समितीने या प्रकरणाची चौकशी एका महिन्यात करावी व यामध्ये अनियमितता असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.

अधिक वाचा –

– शिवली सोसायटीचा निकाल जाहीर; भाजपचा राष्ट्रवादीला धोबीपछाड, ‘या’ गोष्टीमुळे मात्र चिंता कायम
– PHOTO : मनीषा वाणी ठरल्या ‘सौभाग्यवती मावळ 2023’, तळेगावात ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती


Previous Post

शिवली सोसायटीचा निकाल जाहीर; भाजपचा राष्ट्रवादीला धोबीपछाड, ‘या’ गोष्टीमुळे मात्र चिंता कायम

Next Post

भीषण अपघात! भरधाव बस अनियंत्रित झाल्याने पुलावरुन खाली कोसळली; 17 ठार, 30 गंभीर जखमी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident-In-Bangladesh

भीषण अपघात! भरधाव बस अनियंत्रित झाल्याने पुलावरुन खाली कोसळली; 17 ठार, 30 गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.