राजकीय वादातून एकाच वर्षात दोनदा निवडणूक झालेल्या शिवली विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे. 13 सदस्यांच्या या सोसायटीत एक सदस्य बिनविरोध निवडणूक आला होता. त्यामुळे उर्वरित 12 जागांसाठी निवडणूक झाली. यात भाजपा प्रणित श्री भैरवनाथ सर्वपक्षीय पॅनलचे 8 जण निवडून आले, तर राष्ट्रवादी प्रणित महाविकास आघाडी भैरवनाथ सहकारी परिवर्तन पॅनलचे 4 उमेदवार निवडून आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या निवडणूकीच्या माध्यमातून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात धोबीपछाड दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजपासाठी यात आणखीन एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे मागील निवडणूकीत 12 पैकी सर्व 12 संचालक निवडून आणणाऱ्या भैरवनाथ पॅनलचे या निवडणूकीत 4 सदस्य कमी निवडणूक आले आहेत. ( Maval Taluka Shivli Cooperative Society Election Result Announced )
दिनांक 17 मार्च रोजी ही सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी श्री भैरवनाथ सर्वपक्षीय पॅनल विरुद्ध महाविकास आघाडी भैरवनाथ सहकारी परिवर्तन पॅनल अशी सरळ लढत होती. यात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे आणि सचिव संपत आडकर यांनी काम पाहिले.
अधिक वाचा –
– PHOTO : मनीषा वाणी ठरल्या ‘सौभाग्यवती मावळ 2023’, तळेगावात ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती
– ब्राम्हणोली येथील श्री भैरवनाथ देवाचा उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात; 22 मार्चला काल्याचे कीर्तन