व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट, मोदींनी दिले ‘हे’ आश्वासन

संपूर्ण देश तुझ्यासोबत, पंतप्रधानांनी दिले आशिर्वाद... खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने झाली भेट

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 22, 2023
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Chinchwad-Ramila-Latpatte-Met-PM-Modi

Photo Courtesy : Twitter / Shrirang Barne


महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या चिंचवडच्या रमाबाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी रमाबाईला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. आता ‘रमा’ (रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेअंतर्गत त्या जगभ्रमंती करत आहेत. मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा ९ मार्च रोजी प्रारंभ झाला. त्या ८ मार्च २०२४ ला पुन्हा भारतात परतणार आहे. ( Chinchwad Ramila Latpatte Girl who traveled the world on two wheeler met PM Narendra Modi )

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, चिंचवडमधील २७ वर्षीचा उच्चशिक्षित तरुणी रमिला लटपटे नऊवारी नेसून, नथ घालून ४० देशात जगभ्रमंती करत आहे. पुढीलवर्षीच्या ८ मार्च रोजी ती भारतात परत येणार आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविणार आहे. मतदारसंघातील असल्याने तिला मी पूर्णपणे सहकार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून पुढील प्रवास करण्याची विनंती रमाबाईने माझ्याकडे केली होती. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्याकडे वेळ मागितली. पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ वेळ दिली आणि आज भेट झाली.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची आज रमाबाई बरोबर भेट घडवली चिंचवड येथील रमाबाई ही “भारत की बेटी”म्हणून च्याळीस देशांचा प्रवास नऊवारी साडी नेसुन दुचाकी वरून भारतीय वेशात करणार आहे @narendramodi यांनी शुभेच्छा देऊन आशिर्वाद दिले. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/Ze1rdvJtt7

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) March 21, 2023

संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. तुला काहीही अडचण आली. तरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साध, संपूर्ण सहकार्य केले जाईल. व्हिजाची समस्या सोडविली जाईल. माझे आशिर्वाद तुझ्यासोबत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी स्वीय सहाय्यकाला बोलवून घेत रमाबाईला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना गुढी भेट दिली.

याबाबतची माहिती देताना रमाबाई म्हणाल्या,
सहा खंड, ४० देशामध्ये नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणार आहे. भारत की बेटी म्हणून मी दुचाकीवरुन जगभ्रमंती करत आहे. लघुउद्योग, बचतगट आणि भारताच्या कलागुणांचा जगभर प्रसार करणार आहे. त्यामुळे पूर्ण भारत माझ्यासोबत आहे असा विश्वास आहे. ८ मार्च २०२४ रोजी मी भारतात परत येणार आहे. मुंबईतील इंडिया गेट येथून ९ मार्चपासून प्रवासाला सुरुवात केली. तेथून १८०० किलोमीटरचे अंतर कापून आज दिल्लीत पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यांनी मला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत. जगभ्रमंतीसाठी खासदार बारणे यांचे सहकार्य मिळत आहे.

अधिक वाचा –

– ‘मुलगा आमदार व्हावा हे स्वप्न ज्यांनी पाहिलं..’, वडीलांना विधानभवनात घेऊन गेल्यानंतर आमदार सुनिल शेळकेंची भावूक पोस्ट
– नातवासाठी कायपण! मावळात चिमुकल्याच्या नामकरण सोहळ्याला भरवला कुस्त्यांचा आखाडा; इनामात दुभती म्हैस अन् चांदीची गदा


dainik maval jahirat

Previous Post

‘मुलगा आमदार व्हावा हे स्वप्न ज्यांनी पाहिलं..’, वडीलांना विधानभवनात घेऊन गेल्यानंतर आमदार सुनिल शेळकेंची भावूक पोस्ट

Next Post

पुणे जिल्ह्यात 187 गावांत राबवणार जलयुक्त शिवार अभियान 2.0, मावळ तालुक्यातील ‘या’ 13 गावांचा समावेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jalyukt-Shivar-Abhiyan-2.0

पुणे जिल्ह्यात 187 गावांत राबवणार जलयुक्त शिवार अभियान 2.0, मावळ तालुक्यातील 'या' 13 गावांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.