व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘एक इशारा अन् साफ झाला माहीमचा किनारा’, राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर शिंदे सरकारची तत्काळ कारवाई, ‘ती’ मजार हटवली

'दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही, तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार', असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 23, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Mahim-Dargah-Raj-Thackeray

Photo Courtesy : Twitter / MNS Fan


महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे यांनी बुधवारी (22 मार्च) पक्षाच्या शिवाजीपार्क येथील जाहीर मेळाव्यात, माहिम येथील दर्गाह चा विषय मांडला होता. तसेच मागील दोन वर्षांपासून अनधिकृतरित्या इथे दर्गाह ( मजार ) उभा राहत असून शिंदे-फडणवीस सरकारने एका महिन्याच्या आत यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ( After Raj Thackeray warning encroached site of dargah in Mumbai Mahim demolished )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राज ठाकरे यांच्या कालच्या इशाऱ्यानंतर आज (23 मार्च) सकाळीच तातडीने यावर कारवाई करण्यात आली. माहिममधील अतिक्रमण हटवण्याला सुरुवात झाली. खाडीतील मजारच्या जागेवरचा हिरवा झेंडा ही हटवण्यात आला आहे. तसेच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला.

माहिममधल्या या अनधिकृत दर्गाहवर बोलताना राज ठाकरे आक्रमक झाले होते. ‘दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही, तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार’, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला होता.

Novel NIBR Ads

मनसे इम्पॅक्ट pic.twitter.com/owStAWqaDI

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 23, 2023

त्यानंतर हालचालींना वेग आला होता. पोलिसांनी या ठिकाणाची पाहणी रात्री केली तर जिल्हाधिकाऱ्यांनी ती हटविण्याचे तातडीने आदेश दिले. त्याप्रमाणे सकाळी 8 वाजताच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस असा मोठा ताफा माहीमच्या त्या मजारीपाशी पोहोचले. अर्ध्या तासातच हा सगळा परिसर अनधिकृत बांधकाम मुक्त करण्यात आला. या परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

हेही वाचा –

– पुणे जिल्ह्यात 187 गावांत राबवणार जलयुक्त शिवार अभियान 2.0, मावळ तालुक्यातील ‘या’ 13 गावांचा समावेश
– नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट, मोदींनी दिले ‘हे’ आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

श्री पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी संजय दंडेल, पाहा कमिटीची संपूर्ण यादी । Vadgaon Maval

Next Post

PHOTO । वडगावमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा; नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित शोभायात्रेत हजारो नागरिक सामील

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Shobha-Yatra

PHOTO । वडगावमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा; नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित शोभायात्रेत हजारो नागरिक सामील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
Thousands of fish die in Indrayani River at Dehu serious concerns ahead of Ashadhi Wari

देहूतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू ; आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

June 15, 2026
Asphalting of four connecting roads in ​​Keshavnagar area Vadgaon Maval has been completed

वडगावच्या केशवनगरमधील ‘गोखले ले आऊट’ भागातील चार जोडरस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण; नागरिकांनी मानले लोकप्रतिनिधींचे आभार

June 15, 2026
BJP Pawan Maval Mandal organizational review meeting held at Shivne Maval

भाजपा पवन मावळ मंडळाची शिवणे येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

June 15, 2026
Gram-Panchayat-Election

मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?

June 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.