विधानसभेत सन 2023-24 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेत चिंचवडच्या नवनिर्वाचित भाजपा आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी भाग घेतला. यावेळी श्री मोरया गोसावी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्टला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करा. तसेच चापेकर वाड्याचा तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करून विकास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मावळ तालुक्यात लोणावळा खंडाळा राजमाची कार्ला येथे थंड हवेच्या ठिकाणी देशभरातून पर्यटक येतात. लोणावळा-खंडाळा परिसराचा राष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगड विसापूर किल्ल्यांचे संवर्धनाची दुरुस्ती, पर्यटकांना सोयी-सुविधा पुरवणे त्याचबरोबर एकविरा माता कार्ला लेणी व शिरगाव साई मंदिर येथे हे पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार पर्यटकांसाठी व भाविकांसाठी पायाभूत सोयी सुविधा उभारण्याकरिता निधीची आवश्यकता आहे, अशीही मागणी त्यांनी केली. ( MLA Ashwini Jagtap Demand For Funds For Various Tourist Spots In Chinchwad And Maval Taluka )
मावळ तालुक्यातील पर्यटनासाठी विशेष लोणावळा-खंडाळा कार्ला याचा सर्वांगीण पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबत शासनाने नियोजनबद्ध सदर परिसराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
अधिक वाचा –
– देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द
– तृषार्थ वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिरोता वनविभागात 30 वॉटर होल, वनविभागाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक