सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान, जनसेवा डायगनोस्टिक सेंटर आणि विरांगना महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे इथे दिनांक 26 मार्च 2023 रोजी वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत शुगर टेस्टिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 62 नागरिकांनी मोफत शुगर टेस्टिंग सुविधेचा लाभ घेतला. ( Free Sugar Testing Camp For Varkari Citizens In Talegaon Dabhade City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिबिरामध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील ह्यांनी सर्व वारकरी बंधू, भगिनींना आरोग्य तपासणी विषयी योग्य मार्गदर्शन केले.
शिबिराला संस्थानचे यतीन शाह, ऍड किरण गवारे, मुरलीधर ढेकणे, अनिल फाकटकर, अतुल देशपांडे ह्यांनी सहकार्य केले. शिबिराचे प्रास्ताविक मुरलीधर ढेकणे यांनी केले, तर आभार अनिल फाकटकर यांनी मानले. सौरभ चिंचवडे, अनिता गायकवाड, सागर वाघमोडे यांनी शिबिराचे नियोजन आणि शिबीर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. संतोष दाभाडे पाटील यांनी कै. सुरेशभाई शाह यांच्या जयंतीला प्रत्येक वर्षी तळेगाव दाभाडे इथे नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिर घेणार, असे आश्वासन दिले.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात तब्बल 2 लाख 94 हजारांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त; मुद्देमालासह 2 आरोपी अटक
– शिंदे-फडणवीस सरकारवर टीका ते राहुल गांधींना ठणकावले, उद्धव ठाकरे यांचे मालेगाव सभेतील संपूर्ण भाषण, वाचा…