लोणावळा शहरात चोरीची घटना समोर आली आहे. एका डाॅक्टर व्यवसायिकाच्या बंगल्यातून चोरट्यांनी तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी डाॅ. किरण राघवेंद्र चुळकी (वय 44, मुळ रा. विजयपूर, कर्नाटक) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
डाॅ. किरण चुळकी यांचा लोणावळा शहरातील अंबरवाडी गणेश मंदिराजवळ बंगाल आहे. डाॅ. चुळकी आणि त्यांचे मित्र दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यात आले होते. तेव्हा रविवारी (दिनांक 26 मार्च) मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. त्यांनी लॅपटाॅप, पाच महागडे मोबाइल संच, डेबिट कार्ड, रोकड असा एकूण 5 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ( 5 lakh 11 thousand theft in a bungalow in Lonavala city )
फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. शहर पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी मुजावर या प्रतकरणाचा तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम महाराज मोरे; अटीतटीच्या निवडणूकीत 9 मतांनी विजयी
– Lonavala Breaking । भांगरवाडी रेल्वे गेट तीन दिवस बंद राहणार, नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, वाचा सविस्तर