मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास 1 एप्रिलपासून महाग होणार आहे. एक्स्प्रेस वे वर प्रवास करताना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. तसेच जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील टोलनाक्यांवर देखील दरवाढ केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना 2004 साली काढण्यात आली होती. त्यानुसार 2023 मध्ये टोलच्या दरात वाढ होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मात्र, सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सोमाटणे टोलनाक्यावर कुठलीही टोल दरवाढ करु नये, याबाबत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आयआरबीला पत्र लिहीले आहे. ( Do Not Increase Toll Fees At Somatne Phata Toll Booth MP Shrirang Barane Letter To IRB )
“दिनांक 1 एप्रिल पासून, टोल फी (शुल्क) मध्ये दरवाढ करण्यात आलेली आहे. सोमाटणे येथील टोलनाक्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे प्रस्तावित बैठकीमध्ये घेण्यात येणार असल्याचे नियोजित आहे, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडील बैठक होईपर्यंत सोमाटणे फाटा येथील टोल प्लाझा येथे टोल फी (शुल्क) मध्ये दरवाढ करू नये ही नम्र विनंती, असे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांनी आयआरबी टोल प्लाझा, सोमाटणे फाटा, मावळ यांना पाठवले आहे.
अधिक वाचा –
– मावळकरांना गुडन्यूज..! सोमाटणे टोलनाक्यावर फास्टॅगमधून कट झालेले पैसे परत मिळणार, आयआरबीचे पत्र, लगेच वाचा
– शिलाटणे गावातील दिवंगत शिवभक्तांच्या कुटुंबीयांची युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली सांत्वनपर भेट