तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) जवळील माळवाडी (ता. मावळ) येथील प्रगतशील शेतकरी आणि प्रसिद्ध गाडामालक हभप अशोक पचपिंड हे मंगळवारी (दिनांक 4 एप्रिल) रोजी सायंकाळी त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना एक कासव ( Turtle life saved ) आढळून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य प्राणीमित्र भास्कर माळी मामा यांना कळवली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भास्कर माळी हे तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले. शेतात आढळून आलेल्या त्या कासवाचे वय हे साधारण वर्षभर असावे, तसेच त्याला कुठल्याही प्रकारची जखम वगैरे झालेली नव्हती. त्यामुळे त्यांनी तत्काळ कासवाला पाण्यात सोडण्याचे ठरवले आणि नदीत सुरक्षितरित्या सोडून दिले. ( Turtle life saved by farmer immediate help of animal friend of Maval wildlife protector Talegaon Dabhade )
‘नागरिकांनी त्यांच्या परिसरात कोणताही वन्यप्राणी किंवा सर्प जरी दिसला तरीही वन्यजीव रक्षक मावळ या संस्थेतील कोणत्याही प्राणीमित्राशी संपर्क साधावा, तसेच आपला जीव आणि त्या मुक्या प्राण्याचा जीव वाचवावा’, असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– मावळात राष्ट्रवादीला झटका; साळुंब्रे पाठोपाठ शिवली सोसायटीवरही भारतीय जनता पार्टीचा झेंडा
– मोठी बातमी : शिरगाव सरपंच हत्या प्रकरण, पोलिसांना तपासात मोठे यश, प्रमुख हल्लेखोर आरोपींना सिनेस्टाईल अटक