मावळ तालुक्यात एक पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आंदर मावळातील टाटा धरणात हा पर्यटक बुडाला. बुधवार, 5 एप्रिल रोजी हि घटना घडली. वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बुधवारी (दिनांक 05 एप्रिल 2023) रोजी मुळ कोल्हापूर येथील अर्जुन सुभाष माने (वय वर्ष 25) हा आंदर मावळ भागातील वडेश्वर शिंदे घाटेवाडी इथे पर्यटनासाठी आले होते, तेव्हा टाटा धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने सदर पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ( Young Tourist From Kolhapur Drowned In Tata Dam In Maval Taluka )
आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोनावळा आणिन वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना अर्जुन माने यांच्या शोधासाठी पाचारण करण्यात आले असून आज (गुरुवार, 6 एप्रिल) त्यांचा शोध घेतला जात आहे.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! जुना मुंबई पुणे हायवेवर नायगाव हद्दीतील पेट्रोल पंपासमोर अपघात, अनोळखी महिला ठार
– व्हिडिओ : बळीराजामुळे वाचले कासवाचे प्राण, वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्राची तत्काळ मदत । तळेगाव दाभाडे