(पुणे) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे. निवडणूकीने भरावयाची एकूण 4 हजार 590 पदे असून 32 हजार 559 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे. ( Agricultural Produce Market Committee Election 2023 Updates )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झालेल्या 255 कृषि उत्पन्न बाजार समित्या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार 27 मार्च ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत इच्छूक व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्रे मागवण्यात आली होती. या मुदतीमध्ये 32 हजार 559 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.
या कार्यक्रमानुसार सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 पदे भरावयाची असून त्यासाठी 19 हजार 518 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात 1 हजार 20 पदे असून 9 हजार 189 नामनिर्देशन पत्रे, व्यापारी/अडते मतदार संघात 510 पदांसाठी 2 हजार 566 नामनिर्देशन पत्र व हमाल/तोलारी मतदार संघामध्ये 255 पदांसाठी 1 हजार 286 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत, असेही प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! जुना मुंबई पुणे हायवेवर नायगाव हद्दीतील पेट्रोल पंपासमोर अपघात, अनोळखी महिला ठार
– पीसीएनटीडीए हद्दीतील भूमिपुत्रांचा प्रश्न लवकरच सुटणार, खासदार बारणेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही । Pimpri Chinchwad