मावळ तालुक्यातील वराळे गावातील नळ पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज रविवार, 9 एप्रिल रोजी संपन्न झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जल जीवन मिशन अंतर्गत वराळे पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 31 कोटी 48 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून सुमारे 27 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. तसेच भिसे कॉलनी येथे 5 लक्ष लिटर क्षमतेची, कोहिनूर सोसायटी येथे 9 लक्ष क्षमतेची, तिरुमला सोसायटी येथे 5 लक्ष क्षमतेची आणि वराळे गावठाण येथे 5 लक्ष क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे संपुर्ण गावात पाणी उपलब्ध होणार आहे. ( bhoomipujan and dedication of various development works including tap water supply scheme in Varale village presence of MLA Sunil Shelke )
“वराळे गावामध्ये नागरिकीकरण वाढत आहे. मोठे गृह प्रकल्प उभारले जात आहेत. येथे येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी भविष्याचा विचार करुन विकास कामे झाली पाहिजेत. त्या दृष्टीने रस्ते, पाणी पुरवठा अशी कामे होत आहेत. वराळे ग्रामस्थांनी मला नेहमीच भरभरुन साथ दिली. त्यामुळे गावाच्या विकासाला हातभार लावण्याची जबाबदारी माझी देखील आहे,” असे आमदार शेळके यावेळी म्हणाले.
तसेच, ‘विकास कामांमध्ये कुणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नये. आजपर्यंत ज्या विश्वासाने काम करण्याची संधी दिली. तशीच पुढील काळात देखील द्याल ही अपेक्षा बाळगतो. गावातील जी कामे करावयाची असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, नवलाख उंब्रे येथील घटना, अनोळखी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल
– अबब..! तळेगावमधील उच्चभ्रू सोसायटीत अवघ्या दीड तासात तब्बल 2.45 लाखाचे सोने लंपास, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल