टेम्पो चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मावळ तालुक्यातील बधालवाडी गावच्या हद्दीत नवलाख उंब्रे इथे घडली आहे. याप्रकरणी किरण दत्तू गावडे (वय २५ वर्षे, व्या. शेती रा. बधालवाडी नवलाख उंब्रे (ता. मावळ जि. पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अनोळखी वाहन चालकावर भारतीय दंड विधान कलम ३०४ अ, २७९, ४२७ मो वा काक १३४, १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बधालवाडी गावच्या हद्दीत भोसलकर यांच्या घरासमोर नवलाख उंब्रे (ता. मावळ जि. पुणे) इथे हा अपघात घडला. ( Bike rider killed in collision with tempo incident at Navlakh Umbre maval case registered against unidentified driver )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अपघातात मयत झालेले दत्तू चिंतामण गावडे हे बघालवाडी गावच्या हद्दीत भोसलकर यांचे घराच्या समोरून नवलाख उंब्रे (ता. मावळ जि. पुणे) मिंडेवाडीकडून त्यांच्या घरी बधालवाडी नवलाख उंब्रेकडे वळत होते, तेव्हा छोटा हत्ती टेम्पो (क्रमांक. एम.एच. १४ जी यु ४३०३ वरील) चालकाचे नाव पत्ता माहित नाही, याने त्यांच्या ताब्यातील वाहन हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवत भरधाव वेगाने समोरून येऊन दुचाकीस्वार दत्तू गावडे यांना घडक दिली. या अपघातात दत्तू चिंतामण गावडे हे अतिगंभीर जखमी होऊन मृत्यू पावले. तसेच अपघात झाल्यानंतर अपघातास कारण टेम्पो वाहनचालक तिथून फरार झाला आहे, असे फिर्यादीत नमुद आहे. सपोफ किर्वे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– अबब..! तळेगावमधील उच्चभ्रू सोसायटीत अवघ्या दीड तासात तब्बल 2.45 लाखाचे सोने लंपास, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
– शिरे शेटेवाडी येथील आंद्रा धरण पुनर्वसन भूखंड वाटप कार्यक्रम, एकूण 110 लाभार्थी कुटुंबांना प्लॉट वाटप