मावळ तालुक्यातील आंबी येथे आज (शनिवार, दिनांक 8 एप्रिल) रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरे शेटेवाडी येथील आंद्रा धरण पुनर्वसन भूखंड वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी आंद्रा धरण प्रकल्पात जमिनी गेलेल्या 110 लाभार्थी कुटुंबांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते प्रत्येकी २ गुंठे प्लॉट वाटप करण्यात आले. ( Shire Shetewadi Andhra Dam Rehabilitation Plot Allotment to 110 Beneficiary Families Program at ambi maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, आरपीआय पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भास्कर म्हाळसकर, ज्ञानेश्वर दळवी, माऊली शिंदे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम;
यांसह शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, युवा नेते रवि शेटे, गणेश कल्हाटकर, बाळासाहेब घोटकुले, गणेश ठाकर, किरण राक्षे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, सागर शिंदे, अमोल भोईरकर, संदेश शेलार यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘तब्येत बरी नसल्याने मी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन विश्रांती घेत होतो, आणि तुम्ही….’, अजित पवारांनी झापले
– जमीन विक्री व्यवहारात तळेगाव दाभाडे येथील महिलेची 30 लाखांची फसवणूक, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल