जमीन विक्री व्यवहारात महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सन 2013 पासून ते गुरुवार, दि 06 एप्रिल 2023 पर्यंत घर नं 911 रावसाहेब केदारी कॉलनी, संताजी नगर, तळेगांव दाभाडे (ता मावळ जि पुणे) इथे हा प्रकार घडला. या प्रकरणी प्राप्त फिर्यादीवरुन दि 06 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ( 30 lakh fraud of woman in Talegaon Dabhade in land sale transaction )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एका महिलेने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, 1) आयुब शेख, 2) एक महिला (दोघे रा. इद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे) आणि 3) दिपक बोऱ्हाडे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुद तारीख, वेळी आणि ठिकाणी फिर्यादी महिला यांची जमीन विक्री करून देतो, त्या बदल्यात एजंट म्हणुन 4 लाख रूपये ठरले होते आणि त्याबदल्यात चार कोरे चेक फिर्यादी यांच्याकडून आरोपी यांनी घेतले होते. एजंट यांनी चव्हाण व बुचुटे हे जमिनीकरिता गिऱ्हाईक आणले होते. फिर्यादी यांना चव्हान व बुचुडे यांनी 33 लाख रूपयाचे दोन चेक दिले होते, हे आरोपी यांना माहित होते. आरोपी यांनी फिर्यादी यांना सदरचे जमिनीमध्ये खोट आहे हे सांगुन चव्हान व बुचुडे यांनी चेक मागितलेचे खोटे कारण सांगुन फिर्यादी यांचे खात्यामध्ये भरून लगेच ते चेक फिर्यादी यांना एजंट मधून दिले होते. त्यातील 30 लाख रूपये फिर्यादी यांचे खात्यामधून विश्वासघात करून स्वतः करिता सदरचे पैशाचा वापर केला, असे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी अद्याप अटक नाही. तसेच पोउपनि शिंपणे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– कोंडिवडे ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच घरोघरी येणार जलगंगा! नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन संपन्न
– ‘…निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये’, आमदार शेळकेंची बाळा भेगडेंवर जहरी टीका, दिला ‘हा’ सल्ला