पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा नूतनीकरण समारंभ आज (शुक्रवार, दिनांक 7 एप्रिल) मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पीडीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी हात देणे हे जिल्हा बँकेचे ध्येय आहे आणि याच ध्येयाने बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. ( Renovation Ceremony Of Pune District Central Cooperative Bank Talegaon Dabhade Branch Completed In Presence Of Dignitaries )
‘उत्कृष्ट बँकिंग सेवा देताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने ग्राहक व ठेवीदारांचा जिल्हा बँकेवरील विश्वास अधिक दृढ होईल. नूतनीकरणामुळे ग्राहकांना अद्ययावत बँकिंग सुविधा नक्कीच मिळतील. बँकेच्या पारदर्शक कारभाराची अशीच भरभराट व्हावी व सर्वसामान्यांना अधिक लाभ मिळावा,’ अशा सदिच्छा आमदार शेळकेंनी यावेळी दिल्या.
यावेळी आमदार सुनिल शेळकेंसह सहकार महर्षी माऊली दाभाडे, पीडीसीसी बँक अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, बबनराव भेगडे, सीईओ अनिरुद्ध देसाई, अंकुशराव उभे, रवींद्र जोशी, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, दिपक हुलावळे, संघटन मंत्री नारायणराव ठाकर, माजी नगरसेविका वैशाली दाभाडे, संदीप काशीद, विभागीय अधिकारी गुलाब खांदवे, नितीन देशपांडे, संभाजी शिंदे, शांताराम लष्करी, तसेच तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– हनुमान जयंती आणि काळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त टाकवे खुर्द गावात पार पडली भव्य छकडी स्पर्धा
– शिवसेना ठाकरे गटाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर; तालुका संघटक पदी 5 जणांची निवड