मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द गावात श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव आणि हनुमान जयंती निमित्त दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी भव्य छकडी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पंचक्रोशीतील आणि जिल्हाभरातील तब्बल 130 छकडी मालकांनी सहभाग घेतला होता. ( On Occasion Hanuman Jayanti And Lord Kalbhairavnath Utsav Chakdi Competition Held In Takve Khurd Village Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी, घाटाचा राजा सुर्यकांत शेठ शेलार आणि प्रदिप शेठ शेलार यांचा गाडा 15 सेकंद 13 मीली मध्ये धावला. तसेच प्रथम क्रमांक किरण मारुती गायखे व स्वामी गायकवाड यांचा 14 सेकंद 76 मीली, दुसरा क्रमांक सुर्यकांत शेठ शेलार व प्रदिप शेठ शेलार यांचा गाडा 14 सेकंद 98 मीली मध्ये धावला. तर, तिसरा क्रमांक किसनराव सखाराम बच्चे तुंगार्ली व दिनेश धोंडू शिंदे आणि सोमनाथ आहेर जुगलबंदी यांचा 15 सेकंद 23 मीली चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. सिध्देश तापकीर नेले मुळशी यांचा गाडा 15 सेकंद 24 मीली मध्ये धावला.
उत्सवानिमित्त आदल्या दिवशी (दिनांक 5 एप्रिल) समाजप्रबोधनकार ह.भ.प. कृष्णा महाराज राऊत (जालना) यांचे कीर्तन झाले. तर, 6 एप्रिल रोजी सकाळी अभिषेक, पूजा झाल्यानंतर बैलगाडा शर्यत आणि संध्याकाळी भराडाचा कार्यक्रम झाला. यात्रा अतिशय सुंदर आणि भक्तीमय वातावरणात पार पडली. ग्रामस्थ आणि आलेल्या सर्वांसाठी महाप्रसाद यामुळे टाकवे खुर्दची यात्रा खास बनली. महत्वाचे म्हणजे प्रथमच गावाकडून छकडीस्वारांचा सन्मान ही संकल्पना राबवण्यात आली.
अधिक वाचा –
– बाळूमामा उत्सवानिमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’, यशिका चौधरी ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी
– टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा शोध घेण्यात पहिल्या दिवशी अपयश, शुक्रवारी पुन्हा होणार ‘सर्च ऑपरेशन’