जल जीवन मिशन अंतर्गत मावळ तालुक्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तसेच आताही अनेक गावांत या योजनांचे काम सुरु असून अनेक गावांत भूमीपूजन होऊन पाणीपुरवठा योजनांचे काम मार्गी लागत आहे. शुक्रवारी (दिनांक 7 एप्रिल) रोजी आंदर मावळमधील मौजे कोंडिवडे येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन महिला-भगिनींच्या हस्ते पार पडले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कोंडिवडे येथील या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 1 कोटी 67 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून सुमारे तीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि फिल्टर प्लांट करण्यात येणार आहे. तसेच गावात अंतर्गत पाईपलाईन टाकून त्याद्वारे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्यात येणार आहे. ( Tap water supply scheme under Jal Jeevan Mission at Kondiwade andar Maval )
सदर भूमिपूजन समारंभास आंदर मावळमधील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच आमदार सुनिल शेळके यांनी वडगाव येथे तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी प्रस्तावित आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सुचना केल्या होत्या.
अधिक वाचा –
– ‘…निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये’, आमदार शेळकेंची बाळा भेगडेंवर जहरी टीका, दिला ‘हा’ सल्ला
– पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा नूतनीकरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न